बीएसएनएलचे कर्मचारी देशद्रोही ; भाजप खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) बीएसएनएलचे कर्मचारी देशद्रोही आहेत. जे प्रसिद्ध कंपनी विकसित करण्यासाठी काम करण्यास इच्छुक नाहीत. ८८००० हून अधिक कर्मचार्‍यांना काढून टाकले जाणार आहे. कारण सरकार बीएसएनएलचे खाजगीकरण करणार आहे, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपाचे खासदार अनंत कुमार हेगडे यांनी केले आहे. उत्तर कन्नड जिल्ह्यातील कुमटा येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

 

 

आपल्या वादग्रस्त विधानासाठी प्रसिद्ध असणारे भाजपाचे खासदार अनंत कुमार हेगडे यांनी पुन्हा एकदा आक्षेपार्ह विधान केले आहे. बीएसएनएलच्या ८८००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले जाणार आहे. कारण सरकार बीएसएनएलचे खाजगीकरण करणार आहे, असे अनंतकुमार हेगडे यांनी म्हटले आहे. दरम्यान, भाजपाचे खासदार अनंतकुमार हेगडे यांची वादग्रस्त वक्तव्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. दरम्यान, महात्मा गांधीजींनी ज्या सत्याग्रहाचे नेतृत्त्व केले, ते वास्तवात आंदोलन नव्हे, तर एक नाटक होते, असे वक्तव्य अनंतकुमार हेगडे यांनी नुकतेच केले होते.

Protected Content