जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनीधी । जळगाव शहरातील फुले मार्केटजवळील प्रितम चहाच्या दुकानासमोरून एरंडोल येथील तरूणाची ३० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरीस गेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र सुरेश पाटील (वय-२२) रा. टाकरखेडा ता. एरंडोल जि.जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खासगी कामासाठी जितेंद्र पाटील हे दुचाकी (एमएच १९ सीएम ३७६६) ने जळगाव शहरात आले होते. शहरातील फुले मार्केट परिसरातील प्रितम चहाच्या दुकानासमोर दुचाकी पार्क करून बाजार खरेदीसाठी निघून गेले. दरम्यान, दुपारी ३ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी ३० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर शनीवारी ३१ डिसेंबर रोजी दुपारी ५ वाजता त्यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक किशोर निकुंभ करीत आहे.