जळगाव/धरणगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | रविवारी पार पडलेल्या जळगाव व धरणगाव तालुक्यातील १९ ग्रामपंचायतीसाठीची निवडणूकीत १९ पैकी २ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यामुळे मंगळवारी १७ ग्राम पंचायतीचा निकाल जाहीर करण्यात आला. यात मतदारांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास कायम ठेवत, बाळासाहेबांची शिवसेनेच्या उमेदवारांचा मोठ्या प्रमाणात विजयी केले आहे.
जळगाव व धरणगाव तालुक्यातील १९ ग्राम पंचायतीच्या निवडणुकी १६ ग्राम पंचायतीमध्ये आता बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या उमेदवारांना थेट सरपंच म्हणून विजयी केले आहे. सरपंचासोबतच धरणगाव तालुक्यातील ५१ ग्रामपंचायत सदस्यांपैकी तब्बल ४२ ग्रांम पंचायत सदस्य तर जळगाव तालुक्यातील ९२ पैकी ८३ ग्राम पंचायत सदस्य असे एकूण १४३ ग्रा.पं, सदस्यां पैकी तब्बल १२५ सदस्यांनी देखील पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पाठींबा जाहीर दिला आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ग्रामीण भागात शेतरस्ते, शिवरस्ते, ग्रामीण भागातील रस्त्यांची केलेली विविध विकास कामे, विविध गावांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजना, गावातील अंतर्गत रस्ते या कामांच्या जोरावर मतदार हे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबतच असल्याचे सिध्द झाले आहे.
जळगाव व धरणगाव तालुक्यातील या गावांमध्ये फडकला भगवा
सुनंदा सुनील सोनवणे (सुजदे-बिनविरोध ), ज्योती जितेंद्र पाटील (सावखेडा खुर्द-बिनविरोध ), कल्पना लीलाधर पाटील (घार्डी-आमोदे), चंद्रकांत गणपत पाटील (जळके), कैलास सोनू जळके (विदगाव), अनिताबाई नितीन जाधव (वराड खुर्द), संदीप मच्छिंद्र चौधरी (किनोद), सतीश रघुनाथ पाटील (कुवारखेडा), नितीन सुरेश कोळी (भोलाणे), निकिता मोतीलाल सोनवणे (देऊळवाडे) या गावांचा समावेश आहे.
दरम्यान, सावखेडा खु, व सूजदे या गावाची निवडणूक आधीच बिनविरोध झाली आहे. तालुक्यातील सर्व १२ ग्राम पंचायतींवर बाळासाहेबांच्या शिवसेनेने आपले वर्चस्व सिध्द केले आहे. तसेच धरणगाव तालुक्यातील मिलिंद भास्कर बोरसे (धारबिनविरोध ), अनिल महारु पाटील (कल्याणे होळ), कविता काशिनाथ पाटील (खर्डे) , गोरख श्रीराम पाटील (वाघाळूद खु.) , दगडू लहू पाथरवट (भामर्डी), व अर्चना दिनकर पाटील (बोरगाव खु.) येथे भगवा फडकला असून दरम्यान, धरणगाव तालुक्यातील उखडवाडी, जळगाव तालुक्यातील वसंतवाडी व भादली खुर्द या गावांमध्ये अपक्षांनी बाजी मारली असली, तरी अपक्ष उमेदवारांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेला आपला पाठींबा देण्याची तयारी दर्शवली आहे.