पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अल्पभूधारक असलेल्या शेतकऱ्याचा सर्पदंशाने दुदैवी मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील बाळद बुद्रुक येथे घडली आहे. याबाबत पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रविंद्र पुंडलिक सोमवंशी (वय – ४२) रा. बाळद ता. पाचोरा जि.जळगाव असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील बाळद बुद्रुक येथील रविंद्र पुंडलिक सोमवंशी (वय – ४२) हे शुक्रवारी १९ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता पिकास फवारणी करत असतांना त्यांना अचानक विषारी जातीच्या सर्पाने चावा घेतला. त्यात त्याचा दुदैवी मृत्यू झाला. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार ज्ञानेश्वर पाटील हे करीत आहे.
मयत रविंद्र सोमवंशी यांचे पाश्चात्य वृद्ध आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, एक भाऊ, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. मयत रविंद्र सोमवंशी यांचे मोठे बंधु अशोक पुंडलिक सोमवंशी यांना देखील पांढरा कावीळ झाल्यामुळे त्यांची देखील प्रकृती चिंताजनक असल्याने बाळद बु” येथील सोमवंशी परिवारावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मयत रविंद्र सोमवंशी यांचे निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.