चाळीसगाव- लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी | बारावीचा परिक्षेचा निकाल आज दुपारी २ वाजता प्रसिद्ध करण्यात आला. यात मुलींनी पुन्हा एकदा बारावीच्या परीक्षेत बाजी मारली असल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे. तत्पूर्वी तालुक्याचा निकाल एकूण ९०.९० टक्के एवढा लागला आहे.
विद्यार्थ्यांना उस्तुकता लागून असलेल्या बारावी परिक्षेचा निकाल आज रोजी दुपारी २ वाजता जाहीर करण्यात आला. यात ९५.२१ टक्के एवढा निकाल मुलींचा लागला आहे. त्यामुळे मागील शैक्षणिक वर्षाप्रमाणे यंदाही मुलींनी पुन्हा एकदा बारावी परिक्षेत बाजी मारल्याचे निकालातून समोर आला आहे. तत्पूर्वी तालुक्यातून एकूण ४,२१० एवढे विद्यार्थी परिक्षेसाठी बसले होते. त्यापैकी मुलांची २,५५४ तर मुलींची संख्या १,७५६ एवढी होती. दरम्यान जाहीर झालेल्या निकालानुसार २,१५९ मुले व १,६६२ मुलींनी सदर परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. एकूण ४,२१० विद्यार्थ्यांपैकी ३,८३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. दरम्यान ८७.९७ टक्के मुलांनी तर ९५.२१ टक्के मुलींनी पटकाविला असून चाळीसगाव तालुक्याचा एकूण निकाल हा ९०.९० टक्के एवढा लागला आहे. यामुळे मुली ह्या मुलांपेक्षा पुन्हा वरचड ठरल्या आहे. या निकालाने चाळीसगाव तालुक्यात मुलींनी मानाचा तुरा रोवला आहे.