नवी दिल्ली (वृत्तसंस्था) उत्तर चीनमधील एका शहरामध्ये रविवारी ब्यूबॉनिक प्लेगचे दोन नवीन संक्षयित रुग्ण आढळून आले आहेत. यानंतर शहरामधील आरोग्य यंत्रणेने हाय अलर्ट जारी केला आहे.
जगभरामध्ये करोनाबाधितांचा आकडा वाढत असतानाच चीनमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. उत्तर चीनमधील एका शहरामध्ये रविवारी ब्यूबॉनिक प्लेगचे दोन नवीन संक्षयित रुग्ण आढळून आले आहेत. चिनी प्रसारमाध्यमांनी सध्या तरी या आजाराचे दोन रुग्ण आढळून आल्याचे म्हटले आहे. मात्र प्राण्यांमधून मानवामध्ये या आजाराचा सहज संसर्ग होऊ शकतो. त्यामुळेच भविष्यात अशी आणखीन काही रुग्ण आढळण्याची शक्यता असल्यानेच सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ब्यूबानिक प्लेगचे दोन रुग्ण बयन्नुरमधील एका रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहेत. स्थानिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार त्यांनी जारी केलेला सतर्कतेचा इशारा हा २०२० च्या शेवटपर्यंत लागू राहणार आहे.