जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील तांबापुरा येथे जीमच्या बांधकामास विरोध केल्याने यावरुन दोन जणांनी चार महिलांना शिवीगाळ करत धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका महिलेच्या तक्रारीवरुन दोन जणांविरोधात बुधवार, १५ फेब्रुवारी रोजी दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलीस ठाण्यात अदखलपात्र करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील इच्छादेवी मंदिराजवळ संगीता रमेश जाधव ह्या राहतात. तांबापुरा येथे सार्वजनिक शौचालयाच्या जागी जिमचे बांधकाम केले जात असल्याचे माहित पडल्यावर बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास संगीता जाधव याच्या आणखी तीन महिला त्या सार्वजनिक शौचालयांच्या जागी गेल्या. याठिकाणी तांबापुऱ्यातील नासीर लसुनवाला व आसिफ डल्ला हे जिम बांधणार असे म्हणत असतांना, संगीता जाधव तसेच त्याच्यासोबत असलेल्या उज्ज्वला गौतम सुरवाडे, छाया वसंत सुरवाडे, लताबाई अशोक वैराट यांनी दोघंना जिम बांधता येणार नाही असे म्हटले, त्याचा राग आल्याने दोघांनी नासीस व आसिफ या दोघांनी महिलांना शिवीगाळ केली, तसेच आम्ही येथेच जिम बांधू तुम्हाला काय करायचे ते करा, असे म्हणत धमकी दिली. याबाबत संगीता जाधव यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली असून त्यावरुन नासीर लसुनवाला व आसिफ डल्ला रा.सहान मशीद जवळ, तांबापुरा या दोघांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल नीतीन पाटील हे करीत आहेत.