बसमध्ये चढताना वृध्देची गळ्यातील दागिने लांबविले; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील अजिंठा चौकातून बसमध्ये चढतांना गर्दीचा फायदा घेत, महिलेची ४२ हजार रुपये किंमतीची मंगळसूत्र व सोन्याची पोत चोरट्याने लांबविल्याची घटना समोर आली आहे, याप्रकरणी शुक्रवार, १७ मार्च रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 

जळगाव शहरातील कासमवाडी परिसरात मालतीबाई सुखदेव देशमुख वय ६० या वास्तव्यास आहेत. त्या १५ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारा शेगाव येथे जाण्यासाठी अजिंठ चौकातून बसमध्ये बसल्या, बसल्यानंतर त्यांना त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व सोन्याची पोत दिसून आले नाही, बसमध्ये शोध घेतला, विचारपूस केली मात्र मिळाले नाही. बसमध्ये चढतांना कुणीतरी अज्ञात व्यक्तीने आपले मंगळसूत्र व सोन्याची पोत चोरुन नेल्याची खात्री झाल्यावर मालतीबाई देशमुख यांनी दोन दिवसांनंतर शुक्रवारी दुपारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली, या तक्रारीवरुन १० ग्रॅमचे मंगळसूत्र व पाच ग्रॅमची सोन्याची पोत असा एकूण ४० हजारांचा मुद्देमाल चोरुन नेल्याप्रकरणी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक इमरान सैय्यद हे करीत आहेत.

Protected Content