Home क्राईम बसमधून महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोल लांबविली

बसमधून महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोल लांबविली


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील नवीन बसस्थानकात आलेल्या संभाजी नगरातील महिलेच्या गळ्यातील दीड लाख रूपये किंमतीची २८ ग्रॅम वजनाची सोन्याची माळ अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मंगळवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कल्पना अशोक महाजन (वय-५४) रा. संभाजी नगर, जळगाव, या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सोमवार २७ मार्च रोजी दुपारी एक वाजता त्यांचे नातेवाईक कलावती सुरेश महाजन रा. रामानंदनगर यांच्यासोबत रिंगणगाव येथे नातेवाईकांकडे जाण्यासाठी जळगाव शहरातील नवीन बसस्थानक येथे आल्या. रिंगणगाव येथे जाण्यासाठी त्या रवंजा बसमध्ये बसल्या. दरम्यान बसमध्ये मोठी गर्दी होती, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात जवळून बस जात असताना महिलेच्या गळ्यातील दीड लाख रूपये किंमतीची २८ ग्रॅम सोन्याची माळ त्यांच्या गळ्यात दिसून आली नाही. त्यांनी त्यांची बॅग चेक केली असता त्यांना काही माहिती मिळाली नाही. त्यानंतर बस थेट पाळधी पोलीस दूरक्षेत्र येथे नेण्यात आले. त्या ठिकाणी पोलिसांनी प्रत्येक प्रवाशाची विचारपूस करून तपासणी केली. परंतु सोन्याची माळ मिळून आली नाही, अखेर महिलेने मंगळवारी २८ मार्च रोजी दुपारी ३ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी करीत आहे.


Protected Content

Play sound