Home राजकीय बसपाचे आमदार कॉंग्रेसविरोधात मतदान करतील : मायावती

बसपाचे आमदार कॉंग्रेसविरोधात मतदान करतील : मायावती

mayavati
mayavati


लखनऊ (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी वारंवार बसपाच्या आमदारांचे चुकीच्या पद्धतीने त्यांच्या पक्षात विलीनीकरण केले आहे. त्यामुळे बसपाचे आमदार कॉंग्रेसविरोधात मतदान करतील, भाषा बहुजन समाजवादी पार्टीच्या प्रमुख मायवती यांनी स्पष्ट केले आहे. आज मायावती यांनी पत्रकार परिषदेत कॉंग्रेसवर जोरदार टीका केली.

 

 

मायावती पुढे म्हणाल्या की, राजस्थान निवडणुकीत कॉंग्रेसने बसपाच्या आमदारांना आपल्या पक्षात घेतले आहे. हे गेहलोत यांनी चांगले केलेले नाही. राजस्थानमधील निवडणुकांनंतर बसपाने कॉंग्रेसला पाठिंबा दर्शविला, परंतु गहलोत जी यांनी असंवैधानिकपणे बसपाचे सर्व आमदार कॉंग्रेसमध्ये विलीन केले. त्याआधीही त्यांनी हे केले होते आणि म्हणूनच व्हीप बजावण्यात आला आहे. कॉंग्रेसमुळे आम्हाला कोर्टात जावे लागले होते आणि बसपा योग्य वेळेची वाट पाहत होती. यावेळी आम्ही या प्रकरणी शांत बसणार नाही. सर्वोच्च न्यायालयात हा विषय नेणार आहोत. कॉंग्रेसला धडा शिकण्याची गरज आहे, असे मायावती यांनी सांगितले.


Protected Content

Play sound