जळगाव प्रतिनिधी ।शहरातील बळीराम पेठेतील व्यापाऱ्याच्या नवीन बांधलेल्या घरातून २० हजार रूपये किंमतीचे इलेक्ट्रीक वायरचे चार बंडल अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीला आले आहे. याप्रकरणी शहर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
अधिक माहिती अशी की, भागचंद कुंदनमल जैन (वय-६६) रा. बळीराम पेठ हे ईलेक्टॉनिक दुकानाच्या वस्तूंचे होलसेल व्यापारी आहे. बळीराम पेठेतील राहत्या घराचे बांधकाम गेल्या १ वर्षापासून सुरू होते, ते पुर्ण झाल्यानंतर आता घराचे इलेक्ट्रिक फीटींग करण्याचे काम गेल्या महिन्याभरापासून सुरू आहे. नेहमीप्रमाणे ईलेक्ट्रीक फीटींग करणाऱ्या कामगाराने १६ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता काम बंद केले. व घरातला कुलूप लावून चावी जैन यांच्या दिली. दरम्यान, मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजाचे कुलूप तोडून आत ठेवलेले २० हजार रूपये किंमतीचे वायचे ४ बंडल चोरून नेले. हा प्रकार आज सकाळी कामगार कामावर आल्याने लक्षात आला. भागचंद जैन यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून माहिती दिली. शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.