मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अखिल भारतीय बलुतेदार अलुतेदार विकास परिषदेची बैठक बीड येथे पार पडली. या बैठकीत नूतन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. नवनिर्वाचित कार्यकारिणीत जळगाव जिल्ह्याच्या मुक्ताईनगर तालुक्यातील पुरणाड येथील सामाजिक कार्यकर्ते जानकिराम पांडे यांची राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून निवड झाली.
जानकिराम पांडे हे गेली 17 वर्षे सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत. महाराष्ट्र राज्य बेलदार समाज महासंघटनेचे राज्य अध्यक्ष आहेत.त्याच प्रमाणे आता पर्यंत ते बलुतेदार – अलुतेदार विकास परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून कार्य करीत होते.तसेच अखील भारतीय आदिवासी भटके विमुक्त युथ फ्रंटचे कार्याध्यक्ष म्हणून काम करीत होते. त्यांनी आतापर्यंत त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात अनेक जिल्हाधिकारी कार्यालय, आयुक्त कार्यालया बरोबर विधानभवन तसेच 31 ऑक्टॉबर 2009 रोजी दिल्ली संसद भावनावर भव्य यशस्वी मोर्चे काढले आहेत.त्याच बरोबर वेगवेगळ्या ठिकाणी भ्रष्टाचारात अडकलेल्या लाचखोर व कामात अनियमितता करणाऱ्या 40 पेक्षा अधिक अधिकाऱ्यांना निलंबित करून सर्वसामान्यांना न्याय मिळवून दिला आहे. सर्वसामान्यांसाठी, शोषित पीडित वंचितांसाठी लढणारे आक्रमक सामाजिक कार्यकर्ता अशी त्यांची राज्यात तसेच राज्याबाहेर देखील ख्याती आहे.
आतापर्यंत जानकिराम पांडे हे बलुतेदार विकास परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून कार्य करीत होते तर बीड येथे निवड झालेल्या 13 सदस्यीय कार्यकरणीत जानकिराम पांडे यांची राष्ट्रिय कार्याध्यक्षपदी निवड झाल्याने परिसरात तसेच चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे व बलुतेदार तथा अलुतेदारांचे प्रश्न मार्गी लागण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. बलुतेदार- अलुतेदार व आदिवासी भटक्या विमुतांच्या मागण्यांसाठी लवकरच ते राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर मुख्यमंत्री तसेच इतर विभागाच्या मंत्र्यांच्या भेटी घेऊन सर्व मागण्या व त्यावरील उपाय सादर करणार असल्याचे सांगितले.