बदली कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी विलास कदम

पाचोरा, प्रतिनिधी ।   राज्य सरकारी गट  “ड” (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघाशी संलग्न असलेली वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग गट  “ड” बदली कर्मचारी संघटना महासंघाच्या बैठकीत स्थापन करण्यात आली आहे. संघटनेच्या अध्यक्षपदी विलास कदम तर सरचिटणीसपदी मनोज सुर्वे यांची निवड करण्यात आली आहे,  ही निवड महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी जाहीर केली  आहे. 

 

राज्य सरकारी गट “ड” (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघ ही शासन मान्यता प्राप्त संघटना आहे. महासंघाच्या वतीने विविध विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचा-यांचे प्रश्न सोडविण्यात येतात. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागात बदली कामगारांच्या समस्या मोठ्या प्रमाणावर असून त्या तत्काळ सोडविण्यासाठी तसेच त्यांचे प्रश्न प्रभावीपणे सोडविण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग गट – “ड” बदली कर्मचारी संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. त्याची संलग्नता महासंघाशी असेल.

या संघटनेची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे 

अध्यक्ष  विलास कदम (मुंबई), कार्याध्यक्ष  दिनेश कुचेकर (पुणे), सरचिटणीस  मनोज सुर्वे (मुंबई), उपाध्यक्ष  मोहनलाल पंचोल (नांदेड) आणि रोहिदास घारू (यवतमाळ), महिला उपाध्यक्षा  सुचिता मोहिते (मुंबई), कोषाध्यक्ष  विजय म्हामुणकर (मुंबई), सहसचिव  संतोष अरसुडे (लातूर) आणि अनवर कुरणे (सांगली), सह कोषाध्यक्ष  इस्माईल शेख (नांदेड), संघटक  राजू शहाडे (यवतमाळ), महिला संघटक  पुष्पा बिडवे  (अंबेजोगाई), सह संघटक  जयराम केंद्रे (लातूर) आणि प्रकाश घोडके (सांगली), महिला सह संघटक  शर्मिला केंगरे (सांगली), महिला प्रमुख  गोदावरी प्रधान (यवतमाळ), सल्लागार  रामभाऊ पांचाळ (बीड), मुकेश बामणे (यवतमाळ), बाबाराम कदम (मुंबई) आणि पराग आडिवरेकर (मुंबई) याप्रमाणे नियुक्ती करण्यात आली आहे.

 

Protected Content