पाचोरा प्रतिनिधी | तालुक्यातील बदरखे येथे शेतीच्या वादातून 40 वर्षीय तरुण मयत स्थितीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मात्र मयत तरुणाचा खून झाला की आत्महत्या ? हे कारण गुलदस्त्यात आहे. घटनास्थळी पाचोरा पोलीस अधिकारी यांनी धाव घेतली आहे.
याबाबत माहिती अशी की, बदरखे तालुका पाचोरा येथिल बापू धोंडू परदेशी वय ४० हा आखतवाडे येथे सासरवाडी येथे शालकाला भेटण्यासाठी गेला होता. आखतवाडे येथून परत पाचोरा येथे येत असताना रस्त्यावर मयतस्थितीत आढळून आला. घरी जात असताना रस्त्यातच त्याला हार्टअटक आला की विष घेतले हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. त्याला जागेवरच लघुशंका झाल्याचे आढळून आले आहे. घटनेची माहिती पाचोरा पोलिसांना मिळाल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.