बजरंग कॉलनीतून एकाची दुचाकी लंपास; पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । शहरातील शनीपेठ हद्दीतील बजरंग कॉलनी परिसरातून २० हजार रूपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविली. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी की, नितीन लोटु चौधरी (वय-३६) रा. बजरंग कॉलनी, स्वप्नशिला अपार्टमेंटर जळगाव हे खासगी नोकरीस आहे. कामाच्या निमित्ताने त्यांच्याकडे (एमएच १९ बीपी १२६) क्रमांकाची दुचाकी आहे. १२ एप्रिल रोजी त्यांनी त्यांची दुचाकी राहत्या घरासमोर लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्याने २० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेल्याचे १३ एप्रिल रोजी सकाळी उघडकीला आली. परिसरात शोधाशोध करून दुचाकी मिळून आली नाही. नितीन चौधरी यांच्या फिर्यादीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रविंद्र बोदवडे करीत आहे. 

 

Protected Content