Home राजकीय बच्चू कडू राजीनामा देऊन वेगळे व्हा-निलेश राणे

बच्चू कडू राजीनामा देऊन वेगळे व्हा-निलेश राणे

0
36

मुंबई प्रतिनिधी । बच्चू कडू यांच्यासारखा वाघ खोटारड्या सरकारमध्ये शोभत नसल्याचे म्हणत त्यांनी राजीनामा देऊन सरकार मधून बाहेर पडण्याचे आवाहन निलेश राणे यांनी केलं.

आळंदी येथे वारकर्‍यांच्या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलतानी बच्चू कडू यांनी दोन लाखांची कर्जमाफी हे फक्त बुजगावणं असल्याचे वक्तव्य केले होते. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी एका ट्विटच्या माध्यमातून भाष्य केले आहे. यात ते म्हणाले की, बच्चू कडू तुमच्यासारखा वाघ या खोटारड्या आणि शेंबड्या ठाकरे सरकारमध्ये शोभत नाही. तुम्ही शेतकर्‍यांचा आवाज आहात, मग शेतकर्‍यांशी गद्दारी करणार्‍या लोकांसोबत का रहातात ?.. तर राजीनामा देऊन वेगळे व्हा, असे आवाहन राणे यांनी यावेळी केले.


Protected Content

Play sound