चाळीसगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील खेडगाव येथे शेतकऱ्याचे बंद घर फोडून घरातील लाकडी कपाटातून सोन्याचे दानिगे आणि ५० हजारांची रोकड असा एकुण २ लाख ८६ हजारांची मुद्देमाल लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शालीग्राम शंकर माळी (वय-६७) रा. खेडगाव ता. चाळीसगाव हे आपल्या पत्नी प्रमिला यांच्यासह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. ५ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता शालीग्राम माळी हे पत्नी सह शेतात कामानिमित्त घर बंद करून गेले. दुपारी ४ वाजता ते घरी आले तेव्हा घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी लागलीच घरात जावून पाहणी केली असतांना घरातील लाकडी कपाट उडघे होते. पलंग सरकावलेला होता . यात कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण २ लाख ८६ हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. यासंदर्भात त्यांनी तातडीने मेहुणबारे पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीतआहे.