मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील रेणूका नगरात बंद घर फोडून घरातून १६ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने आणि रोकड असा मुद्देमाल असा चोरून नेण्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुक्ताईनगर पोलिसांनी दिलेले माहिती अशी की, मनोज सूर्यकांत घोडके (वय-३२, रा. रेणुका नगर, मुक्ताईनगर) हे आपल्या कुटुंबीयांचा वास्तव्याला आहे. खाजगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. २६ ऑक्टोबर सायंकाळी ६ ते २९ ऑक्टोबर दुपारी १.३० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून घरातून सोन्या-चांदीचे दागिने तसेच रक्कम चोरून नेल्याचे समोर आले आहे. यामध्ये एकूण १६ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार मनोज घोडके यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मुक्ताईनगर पोलिसांची संपर्क साधून माहिती दिली. पोलिसांनी घटनांसाठी धाव घेवून पंचनामा केला. याबाबत मनोज घोडके यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस नाईक महंमद तडवी करीत आहे.