जळगाव, प्रतिनिधी । पिंपरी चिंचवड येथील फ्लायिंग वूमन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या जळगाव जिल्ह्याच्या शहर संघटक प्रमुखपदी संदीप प्रताप पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जळगाव मधील कोल्हे हिल परिसरातील लक्ष्मी नगर येथील रहिवासी संदीप पाटील यांनी विविध क्षेत्रात केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना निवडीचे पत्र प्राप्त झाले आहे. ही निवड संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा छायावती चंद्रकांत देसले यांनी केली आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
4