फ्रीस्टाईल हाणामारी : उसनवारीचे पैशांवरून दोघांमध्ये वाद

 

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । उसनवारीचे पैसे देणे घेण्यावरून दोन जणांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाल्याची घटनाप घाटरोड येथे घडली. याबाबत चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, महबुब सिंकदर मन्सूरी आणि गोकुळू प्रल्हाद पाटील हे दोघे चाळीसगाव शहरातील घाटरोड परिसरात वास्तव्याला आहे. गोकुळ पाटील याने महबुब याला उसनवारीने पैसे दिले आहे. उसनवारीचे पैसे गोकुळने मागितले याचा राग आल्याने सोमवार १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता त्यांच्या घराच्या समोर दोघांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली. दोघांनी एकमेकांना जीवेठार मारण्याची धमकी दिली.

याबाबत दोघांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक भगवान उमाळे करीत आहे.

Protected Content