फैजपूर प्रतिनिधी । कोरोना संसर्ग रोगाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सुविधा वगळता शहरातील प्रमुख बाजार पेठेसह सर्वच दुकाने बंद होती. या आजाराची गांभीर्य लक्षात घेता पालिकेने नागरिकांनमध्ये जनजागृतीसह साफसफाई मोहीम हातात घेतली आहे.
कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर रविवारी शहरात १०० टक्के जनता कर्फ्युला प्रतिसाद मिळाला. राज्यात लागू करण्यात आलेले १४४ कलम अंतर्गत ५ पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ नये तसेच अत्यावश्यक सुविधा वगळता सर्वच प्रकारची दुकाने बंद ठेवण्याचे पोलीस प्रशासन व पालिका प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे. आज सोमवारी शहरात फळे भाजी पाला जीवनावश्यक वस्तू दुकाने वगळता सर्व शैक्षणिक संस्था सर्व दुकाने खासजी अस्तपणात बंद करण्यात आली आहे, तसेच पुढील आदेश होईपर्यत पालिकेची उद्दाने बंद ठेवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शहरातील विविध भांगमध्ये साफसफाईवर भर देऊन फवारणी केली जात आहे. त्याचप्रमाणे कोरोना या आजाराचे गांभीर्य लक्षात घेता प्रमुख चौकांमध्ये पालिकेकडून होर्डिंग लावून जनजागृती करण्यात आली आहे. बाहेरून येणाऱ्या विशेष करून मुबई, पुणे येथून येणाऱ्या लोकांची माहिती काळवण्या संदर्भात पालिकेकडून शहरात दवंडी देण्यात येत असून याविषयी शहरातील स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेऊन पालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन नगराध्यक्षा महानंदा होले, मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी केले आहे.
पालेभाज्या विक्रेत्यांना मुख्याधिकारी यांच्या सूचना
कोरोना संसर्ग जन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक म्हणून फैजपूर शहरात आज पालेभाज्याची दुकाने सुरू होती यावेळी पालेभाज्या कडून जास्त दराने मिरची भेंडी आदी भाज्यांची विक्री होत असल्याची ओरडत पुढे आल्यानंतर मुख्याधिकारी किशोर चव्हाण व पालिका कर्मचारी यांनी या विक्रेत्यांना योग्य दराने पालेभाज्या विक्री करण्याच्या व जास्त गर्दी होऊ नये याची खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या.
जनतेत कोरोना विषाणूचा गांभीर्य नाही
कोरोनाची वाटचाली तिसऱ्या टप्प्याकडे जात असताना व अन्य देशांमध्ये तिसऱ्या टॉपमध्ये वाढलेली रुग्णाची संख्या याचे आकडे जाहीर होत असतांना सुद्धा जनते मध्ये गाभार्यता दिसून येत नाही अजूनही वेळ वाया गेलेली नसून जनतेने शासनाने दिलेल्या सूचनांचे आवाहन प्रशासना तर्फे करण्यात आले. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन गटात झालेल्या दंगलीनंतर एका जणाचा मृत्यू झाला होता तर तीन जण जखमी झाल्याच्या गंभीर घटनेनंतर सोमवारी नाशिक पीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक छेरींग दोरजे यांनी रावेर शहराला भेट देत माहिती जाणून घेतली.