फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । फैजपूर परिसरातील धनाजी नाना महाविद्यालयात भारतीय संविधानाची जनजागृती व्हावी या उद्देशाने ‘संविधान परीक्षा’ ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली.
अधिक माहिती अशी की, फैजपूर परिसरातील धनाजी नाना महाविद्यालयात IQAC समिती व राज्यशास्त्र विभागाच्या वतीने 26 नोव्हेंबर संविधान दिनाच्या नमित्ताने विद्यार्थी,पालक, शिक्षक व सर्व नागरीकांना भारतीय संविधानाची ओळख व्हावी. भारतीय नागरीकांना त्याच्या मुलभूत अधिकार व कर्तव्याची जाणिव व्हावी. भारतीय संविधानाची जनजागृती व्हावी या उद्देशाने ‘संविधान परीक्षा’ ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली.त्यात एकूण 110 स्पर्धकांनी सहभाग घेतला त्यात तायडे पूजा अरुण प्रथम, जुही पाटील द्वितीय, पवार रोहिणी तृतीय क्रमांकाने विजयी झाल्या सर्व विजयी स्पर्धकांना प्राचार्य डॉ.पी.अर.चौधरी यांच्या हस्ते प्रमाणपत्र पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला इतर सहभागी सर्व विद्यार्थांना ऑनलाईन प्रमाणपत्र देण्यात आले. प्रसंगी डॉ.उदय जगताप, डॉ.एस. व्ही.जाधव, डॉ.ताराचंद सवसाकळे, डॉ.निखिल वायकोळ, प्रा.नरेंद्र वाघोदे यांच्यासह आदी उपस्थित होते.