फैजपूर, प्रतिनिधी । दोन महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. या कालावधीत संचारबंदी असल्याने सर्व सण जयंती घरगुती वातावरणात साजरे करण्यात येत आहेत. यातच काल महाराणा प्रतापसिंग यांची जयंती घरगुती वातावरणात साजरी करण्यात आली.
महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. महाराणा प्रतापसिंग यांची जयंती लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर धुमधडाक्यात साजरी न करता अत्यंत साध्य पद्धतीने घरीच साजरी करण्यात आली. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले. यावेळी अक्षय परदेशी, निलेश परदेशी, करण परदेशी, हिमांशू परदेशी, तेजस परदेशी व यश परदेशी उपस्थित होते.