फैजपूर प्रतिनिधी । गेल्या दोन दिवसांपासून बँक बंद असल्याने शुक्रवारी बँक उघडताच ग्राहकांची व्यवहारांसाठी एकच गर्दी केली होती. बँकेसमोर ग्राहकांची गर्दी असतांना केवळ चारच ग्राहकांना व्यवहारासाठी मध्ये जावू दिले जात होते. यात ग्राहकांना कोराना विषाणूचे गांभीर्य लक्षात आले नसावे का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
देशात राज्यात तर आता गाव पातळीवर कोरोना या संसर्गजन्य आजाराने आपले पाय पसरायला सुरुवात केली आहे. त्यामुळे पंतप्रधानांपासून ते गाव पातळीवर सर्वच त्याला आळा घालण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहे. मात्र गावकरी काही ऐकायला तयार नाही सोशल डिस्टन्ससिंगचा तर त्यांनी ऐसी की तैसी करून ठेवली आहे. बँकांचा समोर तर ग्राहकांनी कहरच केला आहे शेवटी पोलिसांना येऊन ग्राहकांना लाईनीत व सुरळीत अंतर ठेवण्याच्या सूचना द्याव्या लागत आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून बँक बंद असल्याने शुक्रवारी बँक उघडताच ग्राहकांनी व्यवहार करण्यासाठी एकच गर्दी केली शहरातील सुभाष चौकात असलेल्या युनियन बँकेसमोर ग्राहकांची मोठी गर्दी जमली होती बँकेत केवळ चारच ग्राहकांना सोडण्यात येत होते. मात्र बँक बाहेर ग्राहक एकमेकांना खेटून उभे होते त्यांना ना कोरोनाची भीती ना कुणीतरी आपल्यासाठी ओरडून ओरडून सांगत आहे याची चिंता नव्हती. त्यातच जनधन खात्यामध्ये आलेली रक्कम करणाऱ्यांची त्यात भर पडली होती. या सर्वांना सोशल डिस्टन्सीची ऐसी की तैशी केली होती. शेवटी पोलिसांनी ग्राहकांची गर्दी पांगवली व सर्वांना एका लाईनीत सुरळीत व सुरक्षित अंतरावर उभे करून व्यवहार करण्याच्या सूचना केल्या.
जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००