Home धर्म-समाज फैजपूर नगरपालिकेतर्फे दिव्यांग बांधवांना निधीचे वितरण.

फैजपूर नगरपालिकेतर्फे दिव्यांग बांधवांना निधीचे वितरण.


फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । फैजपूर नगरपालिकेच्या वतीने २१ फेब्रुवारी रोजी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या उपस्थितीत दिव्यांग कल्याणकारी निधी शहराध्यक्ष नितीन महाजन, दिव्यांग सेनेचे पदाधिकारी यांच्या उपस्थित देण्यात आल.

 

सदर निधी दिव्यांग बांधवाचे बँक खात्यात वर्ग करण्यात आला.यासाठी नपाचे दिव्यांग विभाग प्रकल्प अधिकारी प्रभाकर सपकाळे व लेखापाल निलेश दराडे,विद्या सरोदे यांचे विशेष सहकार्य लाभले. पुढील वर्षी ज्या दिव्यांग बांधवाकडे आँनलाईन UDID (दिव्यांग प्रमाणपत्र) असेल त्यानांच निधी दिला जाणार आहे. तरी दिव्यांग बांधवांनी आँनलाईन प्रमाणपत्र काढुन घ्यावे असे, आवाहन मुख्याधिकारी फैजपूर व दि.से.संघटनेतर्फे करण्यात येत आहे.

 

यावेळी संघटनेचे पदाधिकारी नितीन महाजन अध्यक्ष, भाजप दिव्यांग विकास आघाडीचे तालुकाध्यक्ष नानाभाऊ मोची, तालुका सचिव चेतन तळेले, तालुकाध्यक्ष मुन्ना चौधरी, कार्याध्यक्ष धिरज दाणी, लोणार सरोवरचे अयसान कुरेशी, संजय वानखेडे, कुणाल वाघुळदे, माजी नगरसेवक देवेंद्र साळी, ईरफान मेंबर, कलिम मण्यार व मोहंमद दानिश, अबु बजाज व शहरातील दिव्यांग बांधव ऊपस्थित होते. आभार प्रदर्शन नितीन महाजन यांनी केले.


Protected Content

Play sound