फैजपूर प्रतिनिधी । प्लास्टिक बंदी असताना शहरात अनेक लहान-मोठे व्यावसायिक प्लास्टिक पिशवीचा वापर करताय काल बुधवारी सायंकाळी मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या लहान-मोठ्या व्यावसायिकांवर कारवाई करून ७ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
शासनाने प्लास्टिक बंदीसाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती व उपाय योजना सुरू केल्या आहे. त्याच पार्श्वभूमीवर फैजपूर पालिकेनेसुद्धा प्रत्येक व्यावसायिक व नागरिकांपर्यंत जनजागृतीच्या माध्यमातून माहीती देण्यात आली आहे. मात्र काही व्यावसायिक आडमुठेपणा करून सर्रास प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर करीत आहे. संध्याकाळी मुख्याधिकारी किशोर चव्हाण व प्लस्टिक बंदीचे पथक यांनी अत्यावश्यक सेवा सुरू असणाऱ्या व्यावसायिकाकडून कॅरीबॅग वापर करत नाही याची खात्री केली. जे व्यावसायिक कॅरीबॅगचा सर्रास वापर करीत आढळून आल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करत ७ हजार रूपयांचा दंड वसूल केलाय. यावेळी मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका करनिरक्षक बाजीराव नवले यांच्यासह प्लस्टिक बंदीचे पथक यांनी ही कारवाई केली.