मुक्ताईनगर प्रतिनिधी । वांद्रा येथील गर्दीला कारणीभूत ठरलेल्या एबीपी-माझा या वाहिनीला या संदर्भातल्या वृत्ताबाबत खुलासा करण्यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते सुमेरसिंग राजपूत यांनी नोटीस पाठवली आहे.
याबाबत वृत्त असे की, दि. १४.४.२०२० रोजी एबीपी माझा ह्या न्यूज चॅनेलच्या नावाने एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, त्यामध्ये दाखविण्यात आले होते की, मजुरांना गावी जाण्यासाठी प्रत्येक विभागातून रेल्वे धावणार आहेत. जागोजागी अनेक जण अडकलेले आहेत त्यामुळे आता त्यांना गावी जाण्यासाठी रेल्वे धावणार आहे. त्यामधील प्रतिनिधी यांनी सांगितले होते की, रेल्वे विभागातील पत्र आहे त्या पत्रानुसार, व्हिडीओ कॉन्फरन्स झाली आहे व त्याच्यानंतर पत्र इशू करण्यात आले. प्रत्येक विभागात किती मजूर अडकले आहेत त्याचा डेटा देण्यात आला आहे. लॉकडाउन वाढल्यास वेगवेगळ्या शहरात जे मजूर आहेत त्यांना काढण्याचा प्लॅन बनला आहे. रेल्वे सेवा कामगारांसाठी सुरू करण्यात येणार आहेत.
संबंधीत व्हिडिओ वर १४.४.२०२० तारीख आहे. तसेच त्यामध्ये रेल्वे सुरू करणार हे स्पष्ट सांगत आहेत. ही बातमी जर एबीपी माझा यांनी दिली असेल तर त्याबाबत चौकशी करून कारवाई करावे व सदरील व्हिडीओ चॅनल मार्फत प्रसारीत झाला असेल तर त्यांना यातील माहिती कोणी दिली याबाबत चौकशी करण्यात यावी. हे प्रकरण हे खूप गंभीर स्वरूपाचे आहे, त्यामुळे सुमेरसिंग राजपूत,मुक्ताईनगर यांनी संबंधीत वाहिनीला अॅड. अमोल साळोक यांच्यामार्फत कायदेशीर नोटीसद्वारे कळविले आहे की, प्रकरणात तात्काळ कारवाई करण्यात यावी व त्याबाबत कळविण्यात यावे तसेच सदरील व्हिडीओ क्लिप ही जर फेक असेल तर ७ दिवसाच्या आत कळविण्यात यावे जेणेकरून दोषींविरुद्ध योग्य ती कारवाई करता येईल.