भुसावळ, प्रतिनिधी । तालुक्यातील फेकरी येथे शासन धोरणाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येते असून तलाठी एस. व्ही. कुंभार यांच्या उपस्थित सोशल डिस्टन्स ठेवून नागरिकांना मोफत तांदूळ वाटप करण्यात आले.
फेकरी येथे गुरुवार २३ एप्रिल रोजी मोफत धान्य वाटप करण्यात आले. यावेळी मोफत तांदूळ वाटपाच्या अगोदर तलाठी एस. व्ही. कुंभार आणि ग्रामसेवक आर. एस. मुंडके यांनी लाभार्थ्यांना तोंडाला रुमाल किंवा मास्क बांधण्याच्या सूचना करून सोशल डिस्टनसिंगचे महत्त्व सांगितले. ज्यांची नावे आहेत त्यांना तांदूळ मिळेल अशा सूचना देण्यात आल्या. सकाळी सातवाजेपासून सायंकाळपर्यंत वाटप सुरू होते. याप्रसंगी सरपंच निर्मला निकम व उपसरपंच निलेश प्रभाकर सोनवणे, पोलीस पाटील किशोर मुरलीधर बोरोले, अतुल चोपडे, प्रशांत निकम व रेशनिंग दुकानदार ललिता ईश्वर पवार उपस्थित होते. स्वस्त धान्य दुकान गितेश महिला बहुउद्देशीय संस्था फेकरी दुकान नंबर १ येथे मोफत धान्य वाटप करण्यात आले.