भुसावळ प्रतिनिधी । लॉकडाऊनच्या काळत बेकायदेशीर देशी दारूची विक्री करणाऱ्या एकाला अटक केली असून त्याच्या ताब्यातील १२ हजार रूपये किंमतीचा देशी विदेशी दारूचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील फेकरी येथे संशयित आरोपी सोमा काशीनाथ भटकर हा देशी विदेशी दारूची विक्री करत असल्याची माहिती भुसावळ तालुका पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीसांनी कारवाई करत संशयित आरोपी भटकर याला अटक केली असून त्यांच्या ताब्यातील १२ हजार ४७२ रूपये किंमतीच्या देशी विदेशी दारू हस्तगत केली आहे.
यांनी केली कारवाई
उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सपोनि अमोल पवार, पोहेकॉ विठ्ठल फुसे, युनूस इब्राहिम शेख, अर्चना अहिरे, शिवाजी खंडारे, प्रेमचंद सपकाळे, मजीद पठाण यांनी कारवाई केली.