फॅसिस्ट लोकांची भीती ; अमोल मिटकरींकडून पोलिस सुरक्षेची मागणी

मुंबई (वृत्तसंस्थ) फॅसिझमविरोधात जो जो बोलतो त्याला त्रास होतो. तशा काही गोष्टी आम्हाला जाणवल्या. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मी या सरकारकडे आणि गृहमंत्र्यांकडे सुरक्षेची मागणी केली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी दिली.

 

गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतल्यानंतर अमोल मिटकरी यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले की, आम्ही जेव्हा समाजात फिरतो तेव्हा असुरक्षित वाटते. दोन-तीन वर्षांपूर्वी धमकीचे फोन आणि मेसेजेस आले होते. त्यानंतर मी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील दिले होते. मात्र, त्यावर मागच्या सरकारच्या काळात काही कारवाई झाली नाही. पुरोगामी विचारांच्या माणसांना हे सरकार सुरक्षा देईल, असा मला विश्वास आहे. काही दिवसांपूर्वी अज्ञात मारेकऱ्यांनी प्रहारचे अकोल्याचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांना महाशिवरात्रीच्या दिवशी गोळ्या घालून मारले. 7-8 दिवस उलटले आहेत, त्यातील एकाही आरोपीला अद्याप अटक झालेली नाही. म्हणून गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन सुरक्षेची मागणी केली असल्याचेही मिटकरी म्हणाले.

Protected Content