Home Cities जळगाव फुले मार्केट येथे महात्मा फुले यांची पुण्यातिथी निमित्त अभिवादन

फुले मार्केट येथे महात्मा फुले यांची पुण्यातिथी निमित्त अभिवादन


जळगाव प्रतिनिधी । महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यातिथीनिमित्त शहरातील फुले मार्केट परिसरात महात्मा फुले यांच्या पुतळ्याला महापौर जयश्री महाजन यांच्याहस्ते माल्यार्पण करून अभिवादन आज सकाळी करण्यात आले.

यावेळी महापौर जयश्री महाजन यांनी महात्मा ज्योतीबा फुले यांच्या कार्याला उजाळा दिला. अभिवादनाच्या कार्यक्रमाला महापौर जयश्री महाजन, महाराष्ट्र जनक्राती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे, छावा मराठा युवा महासंघाचे अमोल कोल्हे, हरिश्चंद्र सोनवणे , रमेश सोनवणे , दिलीप सपकाळे , वाल्मिक सपकाळे , महेंद्र केदारे , राजू सोनवणे , महात्मा फुले समता परिषदेच्या निवेदिता ताठे , संतोष इंगळे , सुभाष माळ , नंदू माळी , महानगरपालिकेचे चंद्रकांत वांद्रे , गोपी सपकाळे, शिक्षक भारतीचे जिल्हा अध्यक्ष सोमनाथ पाटील, कार्याध्यक्ष अजय पाटील, पंकज गरुड, किशोर पाटील, पद्माकर चौधरी, अजित चौधरी, मानव भालेराव यांच्यासह आदी उपस्थित होते .


Protected Content

Play sound