Home प्रशासन नगरपालिका फुटपाथसह दुभाजकांच्या लोखंडी ग्रील्सची चोरी

फुटपाथसह दुभाजकांच्या लोखंडी ग्रील्सची चोरी

0
122

 

 

भुसावळ : प्रतिनिधी ।  शहरात भुरट्या चोरांचा उच्छाद वाढला असून, जामनेर रोडवरील दुभाजकावर बसविण्यात आलेले लोखंडी ग्रील्सची काही दिवसांपासून चोरी होत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने पालिकेच्या साधनसंपत्तीची नासधुस होत आहे.

 

भुसावळ शहरातील मुख्य रहदारीचा रस्ता असलेल्या जामनेर रोडचा विकास करण्यात आला  रस्ता रुंदीकरण करुन, रस्त्याच्या मधोमध दुभाजक तर रस्त्याच्या दुर्तफा पादचाऱ्यांसाठी फुटपाथ बनविण्यात आले होते. या दुभाजक आणि फुटपाथला लोखंडी ग्रील्स बसविण्यात आले होते. यातील फुटपाथवर तर केव्हाच लोखंडी ग्रील्स चोरीला जाऊन अतिक्रमण करण्यात आले आहे. याठिकाणी परिसरातील दुकानदारांनी अतिक्रमण केल्याने फुटपाथच गायब केले आहेत. तर आता उरलेसुरलेले दुभाजकावरील लोखंडी ग्रील्स देखील चोरीला जात आहे. जामनेर रोडवर बाजारपेठ पोलिस ठाण्यापासून ते अष्टभुजा देवी मंदीरापर्यंत दुभाजकावर लोखंडी ग्रील्स बसविण्यात आले हे ग्रील्स देखील चोरीला जात आहे. या रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी रातोरात ग्रील्स कापून चोरी केल्याचे दिसून येत आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी पालिका प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

 


Protected Content

Play sound