Home क्राईम फुकटपुरा येथे जावई व सासरा यांच्यात हाणामारी

फुकटपुरा येथे जावई व सासरा यांच्यात हाणामारी

0
42


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | मुलीला घेण्यासाठी आल्याच्या कारणावरून जावई आणि सासरा यांच्या वाद होवून एकमेकांमध्ये झोंबाझोबी झाली. तर एकमेकांना लोखंडी पट्टीने मारहाण करून दुखापत केल्याची घटना फुकटपूरा येथे घडली आहे. याबाबत बुधवार ७ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघांवर परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, शेख शकील शेख इनायत (वय-४८) रा. फुकटपूरा, तांबापूरा हे आपल्या परिवारसह वास्तव्याला आहे. याच परिसरात त्यांची मुलगी मुस्कानबी आणि जावाई शेख जाकीर शेख नासिर हे राहतात. बुधवार ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास शेख शकील हे आपल्या मुलीला घेण्यासाठी तिच्या घरी गेले होते. याचा जावाई शेख जाकीर शेख नासीर याला राग आला. जावई आणि सासरे यांच्या वाद झाल्याने एकमेकांमध्ये झोंबाझोबी झाली. त्यानंतर दोघांनी एकमेकांना लोखंडी पट्टीने डोक्यावर मारहाण करून दुखापत केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री ११ वाजता परस्पर विरोधात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नितीन पाटील करीत आहे.


Protected Content

Play sound