मुंबई प्रतिनिधी । पुणे येथील फर्ग्युसन कॉलेजला विद्यापीठाचा दर्जा देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
फर्ग्युसन कॉलेजची स्थापना १८८५ साली लोकमान्य टिळक व समाजसुधारक आगरकर यांच्या पुढाकाराने झाली होती. या महाविद्यालयातून शिक्षण घेतलेल्या अनेक मान्यवरांनी विविध क्षेत्रांमध्ये नावलौकीक मिळवला आहे. या कॉलेजला २०१६ ते २०२१ अशा सहा वर्षांसाठी स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा मिळाला होता. तर आता हे महाविद्यालय विद्यापीठ होणार आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत फर्ग्युसन कॉलेज या स्वायत्त संस्थेचे रूपांतर फर्ग्युसन युनिव्हर्सिटीमध्ये करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.