जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथे लागोपाठ दुसर्या दिवशी गाटपिटने झोडपले असून यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
काल जामनेर तालुक्याला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका पडला होता. यात फत्तेपूर, वाकोद आदींसह अन्य गावांमध्ये वादळी वारे आणि मुसळधार पावसासह गारपीट झाली होती. यानंतर आज फत्तेपूर तसेच परिसरातील गावांना लागोपाठ दुसर्या दिवशी गारपिटीचा फटका बसला.
फत्तेपूर परिसरात आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास साधारणपणे २३-२४ मिनिटांपर्यंत तुफान गारपिट झाली. यात बोरांच्या आकाराच्या गारींचा समावेश होता. यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शिवारात असलेला गहू आणि मका यामुळे उध्वस्त झालेला आहे. यासोबत आंब्यालाही गारपिटीची मोठा फटका पडल्याचे दिसून येत आहे. या अवकाळी गारपिटीमुळे परिसरातील शेतकर्यांची मोठी आर्थिक हानी झाली असून त्यांना मदत मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे.