मुंबई (वृत्तसंस्था) विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यात अपयशी ठरल्याने फडणवीस सरकारची बळीराजा चेतना योजना ठाकरे सरकारने बंद केली आहे. ही योजना २०१५ मध्ये जाहीर झाली होती.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारने देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात घेतलेला आणखी एक निर्णय रद्द केला आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी फडणवीस सरकारने आणलेली ‘बळीराजा चेतना योजना’ ठाकरे सरकारकडून बंद करण्याचा निर्णय काल घेण्यात आला. ‘मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यात बळीराजा चेतना योजनेला अपयशी ठरली आहे. त्यामुळे २४ जुलै २०१५ रोजी जाहीर करण्यात आलेली ही योजना तातडीने बंद करण्यात येत आहे, असे आदेश मदत आणि पुनर्वसन विभागाने बुधवारी जारी केले.