प.वि.पाटील विद्यालयात बालदिन उत्साहात साजरा  

 

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयात भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालदिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

सर्वप्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा पाटील यांच्या हस्ते पंडित जवाहलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी सुंदर असे विविध रंगांचे नेहरू ड्रेस परिधान केलेले होते त्याचबरोबर चाचा नेहरूंना आवडणारे गुलाबाचे फुलही काहींनी आपल्या जॅकेट वर लावलेले होते. आपल्या आवडत्या चाचा नेहरूंविषयी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत अतिशय सुंदर रित्या यावेळी मांडले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उपशिक्षिका कल्पना तायडे यांनी केले तर आभार उपशिक्षिका स्वाती पाटील यांनी मानले तर कायनात सैय्यद व चारुलता वायकोळे यांनी परिश्रम घेतले प्रसंगी शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Protected Content