Home Cities जळगाव प.वि. पाटील विद्यालयात उभारली ज्ञानाची गुढी

प.वि. पाटील विद्यालयात उभारली ज्ञानाची गुढी


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि. पाटील प्राथमिक विद्यामंदिर येथे गुढीपाडव्याच्या व नववर्षाच्या निमित्ताने ज्ञानाची गुढी उभारण्यात आली.

सर्वप्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा पाटील यांच्या हस्ते या गुढीचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी उभारलेल्या गुढीमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारची पुस्तके तसेच ग्रंथ ठेवून त्यांचा परिचय विद्यार्थ्यांना करून देण्यात आला व या नववर्षापासून आपण नवनवीन पुस्तक वाचून आपले ज्ञान वाढवण्याचा मानस यावेळी विद्यार्थ्यांनी केला.

गुढीपाडव्या संदर्भात शाळेचे शालेय शिक्षण समन्वय चंद्रकांत भंडारी यांनी विद्यार्थ्यांना त्यावेळी मार्गदर्शन केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपशिक्षक योगेश भालेराव तसेच शिपाई सुधीर वाणी यांनी परिश्रम घेतले प्रसंगी सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound