प.वि.पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची रक्षाबंधन उत्साहात

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रक्षाबंधनाचा सण आला. ताई दादाच्या आठवणी जाग्या झाल्या, बहीण भावाचं प्रेम जगावेगळं, एका राखीत सगळं काही समावल. अशा या बाहीणभावाच्या नात्याच्या अचूक बंधनाचा सण म्हणजे रक्षाबंधन केसीई सोसायटीच्या गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयात मोठ्या थाटामाटात पार पडला.

सर्वप्रथम शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून टाकाऊ वस्तूचा वापर करून सुंदर अशा राख्या तयार करण्याची कार्यशाळा आयोजित केली त्यात विविध प्रकारच्या राख्या तयार करण्यात आल्या आणि त्याच राख्यांचा उपयोग करून रक्षाबंधन सणानिमित्त मुलींनी आपल्या वर्गबंधूना राख्या बांधल्या. मुख्या.रेखा पाटील यांनी विद्यार्थ्यांना रक्षाबंधन सणा ची माहीती सांगत प्रत्येक मुलगी ही आपली बहीण आहे या नात्याने आपण तिचे रक्षण केले पाहिजे असे प्रतिपादन यावेळी केले.
कार्यक्रमाचे आयोजन कल्पना तायडे, स्वाती पाटील, दिपाली चौधरी, कायनात तडवी यांनी केले तर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

 

Protected Content