प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरणाऱ्या व्यावसायिकांना पालिकेच्या पथकाकडून ताकीद

खामगाव अमोल सराफ | येथील काही व्यावसायिक प्लॅस्टिकबंदी निर्णयास हरताळ फासत असल्याचे आढळून येत असल्याने पालिकेच्या आरोग्य विभागाकडून प्लास्टिक बंदी मोहीम हाती घेण्यात आली आहे. यात आज प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरणाऱ्या व्यावसायिकांना पालिकेच्या पथकाकडून ताकीद देण्यात आली असून उद्यापासून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

 

 

प्लॅस्टिकबंदीचा निर्णय झाल्यापासून व्यापाऱ्यांनी प्लॅस्टिक कॅरीबॅगचा वापर कमी केल्याने प्लॅस्टिकच्या कॅरीबॅग आटोक्‍यात आल्या आहेत. परंतु सध्याच्या काळात पुन्हा व्यापारी आणि किरकोळ व्यापाऱ्यांकडून प्लॅस्टिकबंदीला हरताळ फासला जात असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात कॅरीबॅग, “प्लॅस्टिक ग्लासआणि पाणी पाऊचचा वापर आणि विक्री सर्रास सुरु असल्याचे पहायला मिळत आहे. याबाबत नगर पालिकेच्या आरोग्य विभागाने आज मोहीम राबवित शहरातील व्यावसायिकांकडे जाऊन प्लॅस्टिक कॅरीबॅग चा वापर बंद करावा अन्यथा उद्यापासून दंडात्मक कारवाईला सामोरे जावे अशी ताकीद देण्यात आली. पालिकेच्या वतीने आज दिवसभर हि मोहीम राबविल्यानांतर उद्यापासून दंडातक कारवाईसाठी मोहीम राबविली जाणार आहे.

 

Protected Content