एरंडोल, प्रतिनिधी । शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचे मॅनेजर आशिष मेंढे यांचा मुलगा अर्णव याचा आठवा वाढदिवस खडके बु.येथिल अनाथ, निराधार मुलां मुलींच्या संस्थेत साजरा केला.
अर्णव याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संस्थेत केके कापण्यात आला. तसेच परिवारातील सदस्यांनी मुलांशी संवाद साधला असता परिस्थितीशी संघर्ष करून जगत असलेल्या बालकांच्या चेह-यावरील हास्य पाहुन ते भारावून गेले. वाढदिवसानिमीत्त या संस्थेस भेट दिल्यामुळे फारच आत्मिक समाधान वाटले असल्याची भावना मेढे परिवारातर्फे व्यक्त करण्यात आली. यावेळी वाढदिवसाच्या निमित्त बालकांना प्रोजेक्टर भेट म्हणून देण्यात आले. याप्रसंगी मिष्टान्न स्नेह भोजन देण्यात आले. याप्रसंगी आचार्य गरूड महाविद्यालयाचे प्रा. डॉ. शाम साळुंखे ,शाखा प्रबंधक नंदलाल पाटील, मॅनेजर विशाल इंगळे, अनुपम कुमार, शशिकांत घोडके, कॅशियर सुनिल पिंगळे, कृष्ण साळुंखे, प्रशांत पेंढारकर, प्रकाश वाघ, इंदर साहेब, महेश बिर्ला, सद्दाम टकारी, उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी संस्थाचालक भुषण पाटील यांनी मेंढे साहेब यांनी वाढदिवस संस्थेत साजरा केल्यामुळे मनस्वी आभार मानले. कार्यक्रमासाठी अधिक्षक मधुकर कपाटे, प्रमोद पाटील, गणेश पंडीत, ॠषीकेश ठाकरे, तुषार अहिरे, अरूणा पंडीत, सोनाली अहिरे यांनी कामकाज पहिले.