प्रेमविवाह न करण्याची शपथ घेणारी विद्यार्थिनी प्रियकरासोबत पसार !

अमरावती (वृत्तसंस्था) ‘व्हॅलेंटाईन्स डे’च्या मुहूर्तावर प्रेमविवाह न करण्याची शपथ घेणाऱ्या विद्यार्थिनींपैकी एक विद्यार्थिनी प्रियकरासोबत पसार झाल्याने खळबळ उडाली आहे.

 

अमरावती जिल्ह्यातील टेंभुर्णी गावात राष्ट्रीय सेवा योजनांच्या कार्यक्रमात विद्यार्थिनींनी प्रेम आणि प्रेमविवाह न करण्याची शपथ देण्यात आली होती. या गोष्टीला आठवडा उलटत नाही, तोच प्रियकरासोबत पळालेल्या विद्यार्थिनीच्या नातेवाईकांनी चांदुर रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. दुसरीकडे प्रेम विवाह शपथ न देण्याची शपथ देण्यावसरून गदारोळ झाल्यानंतर शपथ देणाऱ्या शिक्षकांना निलंबितही करण्यात आले होते. शिक्षकांचे निलंबन मागे घेण्यासाठी विद्यार्थिनी कॉलेजसमोर आंदोलनाला बसलेल्या असतानाच हा प्रकार समोर आला.

Protected Content