जळगाव, प्रतिनिधी । विवेकानंद प्रतिष्ठान प्राथमिक शाळा वाघ नगर येथील माध्यमिक विभागात डिसेंबर महिन्यात घेण्यात येणारा सकस आहार हा उपक्रम ऑनलाईनच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. अभ्यासाबरोबरच सर्वांगीण विकास सुदृढ आरोग्य समतोल आहार या सगळ्याचा विचार करून उपक्रम घेण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची व योग्य आहाराची विद्यार्थ्यांना जाणीव देत संपूर्ण महिनाभर नियोजन करण्यात आले आहे. हिरव्या पालेभाज्या ,तांदळाचे, विविध डाळींचे पदार्थ ,मोड आलेली कडधान्ये यांचा त्यात समावेश आहे. आईच्या मदतीने किचनमध्ये ठरवून दिलेला पदार्थ बनवून ऑनलाईन सुद्धा दाखवत आहेत. ठरवून दिलेल्या वेळेत रोज नियोजनानुसार टिफिन शिक्षकांना दाखवत आहेत. अनुभूती शिक्षण या जीवन कौशल्याचा वापर स्वतः विद्यार्थी उपयोजन करत आहेत आईच्या मदतीने स्वयंपाक घरातील विज्ञान विद्यार्थीनी व विद्यार्थ्याचे आई -पालक ऑनलाईनच्या माध्यमातून शिकत आहेत. अतिशय उत्साहपूर्ण सर्व पालकांचा यात सहभाग होत आहे. सौ. सोनल महाजन, सौ. साने , धनश्री पाटील व नेहा सुरळकर, समृद्धी सोलंके या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. दररोज १५ मिनीटे आई स्वतः एका पदार्थाची पाककृती विद्यार्थ्यांना करून दाखवत आहे .ह्या उपक्रमाला मुख्याध्यापक हेमराज पाटील, समन्वयिका वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे.