प्रमाणिकपणाशी तडजोड केल्याबद्दल न्या.गोगोई लक्षात राहतील : कपिल सिब्बल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) माजी न्यायमूर्ती आणि राज्यसभेसाठी उमेदवारी मिळवणारे रंजन गोगोई हे प्रमाणिकपणाशी तडजोड केल्याबद्दल यापुढे लक्षात राहितील, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी केली आहे.

 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी रंजन गोगोई यांचे नाव राज्यसभेसाठी घोषित केले आहे. यावरून सिब्बल यांनी ट्विट करून गोगोई यांच्यावर निशाना साधला. ट्विटमध्ये सिब्बल यांनी म्हटलेय की, माजी न्यायमूर्ती एच.आर. खन्ना हे प्रमाणिकपणा, सरकारसमोर उभं राहणे आणि कायद्याचे राज्य कायम ठेवण्यासाठी परिचीत आहेत. मात्र न्यायमूर्ती गोगोई राज्यसभेसाठी सरकारसोबत उभं राहणे आणि प्रमाणिकपणाशी तडजोड करण्यासाठी लक्षात ठेवले जातील,असे म्हटले आहे.

Protected Content