जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | केंद्र शासनाने प्रधानमंत्री सूक्ष्म प्रक्रिया उद्योग (PMEME) योजनेत एक जिल्हा एक उत्पादन अट शिथील करण्यात आली असून योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी केले आहे.
या व्यतिरिक्त नवीन प्रक्रिया उद्योग सुरु करण्यासाठी व कार्यरत उद्योगांचे विस्तारीकरण व स्तरवृध्दी करण्यासाठी योजनेचा लाभ घेता येणार आहे.
सदर योजनेत सहभाग नोंदविण्यासाठी www.pmfme.mofpi.gov.in या पोर्टलवर अर्जदार स्वतः किंवा जिल्ह्याव्दारे निवड करण्यात आलेल्या जिल्हा संसाधन व्यक्तीं मार्फत अर्ज ऑनलाईन करावा. अधिक माहितीसाठी अनिल भोकरे 9423574573, अमित पाटील – 9423962945, सप्निल पवार – 9158662265 या क्रमांकावर संपर्क साधावा असेही त्यांनी कळविले आहे.