प्रदूषणामुळे मानवी लिंगाचा आकार लहान होत असल्याचा दावा

 

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ।  प्रदूषणाचा परिणाम होऊन मानवी लिंगाचा आकार लहान होत असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.

 

प्रदूषणाचे अनेक दूष्परिणाम ऐकायला मिळतात. मानवी श्वसन संस्थेवरही प्रदूषणामुळे विपरित परिणाम होतो, हे पण आपण ऐकलं असेलच! पण प्रदूषणामुळे मानवी लिंगाचा आकार लहान होत असल्याचं कधी ऐकलंय का? पण नव्यानेच समोर आलेल्या एका संशोधनातून हे समोर आलं आहे.

 

प्रदूषणामुळे मानवी लिंगाचा आकार लहान होत असून, काही वर्षांपासून वाढलेल्या प्रदूषणामुळे होत असल्याचा दावा पर्यावरण शास्त्रज्ञांनी केला आहे. वाढत्या प्रदूषणामुळे जन्माला येणाऱ्या लहान मुलांच्या लिंगाचा आकार लहान होत असल्याचंही संशोधकांनी म्हटलं आहे. डॉ. शन्ना स्वान यांनी लिहिलेल्या संशोधन करून ‘काऊंट डाऊन’ हे पुस्तक लिहिलं असून, या पुस्तकात हा दावा करण्यात आला आहे. “प्रजनन दरामध्ये माणूस संकटाचा सामना करत आहे, कारण मानवी लिंगाचा आकार लहान होत आहे आणि जनन इंद्रियही खराब होत आहे. त्याचबरोबर मानवी प्रजननालाही अवघड परिस्थितीकडे ढकलत आहे, असं या पुस्तकात म्हटलेलं आहे.

 

प्लास्टिकमध्ये वापरण्यात येणारा फॅथलेट्स हा घटक माणसाच्या एंडाक्रॉइन संस्थेवर परिणाम करत असल्याचं संशोधनात आढळून आल्याचं संशोधकांनी म्हटलं आहे. एंडाक्रॉइन संस्था हार्मोन्स निर्मिती करते. फॅथलेट्सचा वापर प्लास्टिक लवचिक करण्यासाठी होतो. स्वान यांच्या म्हणण्याप्रमाणे खेळणी आणि जेवणामध्ये मिसळला जात असून, मानवाच्या प्रजनन संस्थेला धोका पोहोचवतो, असंही त्यांनी म्हटलं आहे.

 

या संशोधनावर स्वीडनची पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटानंही चिंता व्यक्त केली आहे. तिने ट्विट करत पुढील पर्यावरण लढ्यात सगळे भेटू, असं ट्विट केलं आहे.

 

 

फॅथलेट्स एस्ट्रोजन हार्मान्सची नकल करतो आणि त्यामुळे शरीरातील हार्मान्स निर्मितीची प्रक्रिया बिघडते. याचा नवजात बालकांवर आणि ज्येष्ठांवर परिणाम होत असल्याचा दावाही संशोधनाच्या आधारे करण्यात आला आहे.

Protected Content