यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील सातोद कोळवद येथील प्रतिबंधीत क्षेत्राला पोलीस व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी भेट देवुन तेथील नागरीकांना कोरोना विषाणुच्या संसर्गामुळे होणाऱ्या आजारापासुन सावध राहण्यासाठी मार्गदर्शन करत प्रतिबंधीत क्षेत्राच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सुचना नागरीकांना दिल्यात.
यावल तालुक्यातील प्रतिबंधित क्षेत्रास पोलीस व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी भेट दिली. याप्रसंगी प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना विविध सूचना देण्यात आल्यात. यात या नियम तोडुन क्षेत्राच्या बाहेर फिरणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाच्या माध्यमातुन गुन्हे दाखल करून प्रसंगी दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस निरिक्षक अरुण धनवडे यांनी सांगीतले आहे. यावल तालुक्यात कोरोनाची लागण झालेले एकुण ५६ बाधीत रुग्ण आढळुन आले असुन यावल शहरात १८ तर फैजपुर शहरासह ग्रामीण क्षेत्रात जवळपास २२ प्रातिबंधीत क्षेत्र असुन या प्रतिबंधीत क्षेत्रातील अनेक नागरीक शासनाचे नियम न पाळता विविध कामानिमिताने बाहेर फिरतांना दिसुन येत असून अशा नागरीकांनी कोरोना संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेवुन नियमांची काटेकोर अमलबजावणी करून घरातच रहावे. प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन प्रांत आधिकारी डॉ. अजीत थोरबोले, तहसीलदार जितेन्द्र कुवर, पोलीस निरिक्षक अरुण धनवडे आणि आरोग्य प्रशासनाच्या माध्यमातुन करण्यात येत आहे.