यावल, प्रतिनिधी । कोरोना या संसर्गजन्य आजाराने मागील आठ दिवसात यावल तालुक्यात वेगाने शिरकाव केला आहे. कोरोनाबाधीत आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरीकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. प्रांत अधिकारी डॉ. अजीत थोरबोले यांनी आज सकाळी प्रतिबंधीत क्षेत्राची पाहणी करून नागरीकांना विशेष काळजी घेण्याचे व प्रशासनास सर्तक आणि जागृत राहण्याचे आवाहन केले .
यावल शहरातील देशपांडे गल्ली मेन रोडच्या परिसरातील काल एक आणि बाबुजीपुरा क्षेत्रातील एक असे दोन जणांचा कोरोना चाचणी अहवाल हा पॉझिटीव्ह आला आहे. शहरासह तालुक्यातीत पॉझीटीव्ह आलेल्या रुग्णांची बाबुजीपुरा दोन , पुर्णवाद नगर एक , सुर्दशन चित्र मंदीर क्षेत्र दोन , देशपांडे गल्ली मेन रोड एक , दहिगाव एक , कोरपावली येथे दोन अशी एकुण रुग्णांची संख्याही ९ झाली आहे. पाच क्षेत्रांना प्रतिबंधीत करण्यात आले आहे. डॅा. अजीत थोरबोले यांनी आज तात्काळ भेट देवुन परिस्थितीची पाहणी करून प्रशासनाला प्रतिबंधीत क्षेत्रासाठी घ्याव्याची काळजी सदंर्भात म्हत्वाच्या सुचना दिल्यात. यावेळी तहसीलदार जितेन्द्र कुवर , पोलीस निरिक्षक अरूण धनवडे, यावल नगर परिषदचे मुख्याधिकारी बबन तडवी , बांधकाम अभियंता हाजी सईद शेख खाटीक ,यावल शहर तलाठी शरद सुर्यवंशी यांच्यासह विविध प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी उपाययोजना म्हणुन संपुर्ण प्रतिबंधीत क्षेत्राला सील केले. यावेळी प्रतिबंधीत क्षेत्रातील नागरीकांनी शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे व आपल्या आरोग्याची काळजी घेवुन प्रशासनास सहकार्य करावे. प्रतिबंधीत क्षेत्रातील राहणाऱ्या नागरीकांनी बंधीत क्षेत्राबाहेर आल्यावर त्यांच्या दंडात्मक कारवाईस सामोरे जावे लागु शकतो अशा सुचना प्रांत आधिकारी डॉ. थोरबोले यांनी केल्या आहे.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/920887818325069/