जळगाव प्रतिनिधी । पोलीस मुख्यालयातील पोलीस वसाहतीच्या बांधकामच्या ठिकाणाहून काँक्रिट बुम पंपचे रिमोट व चावी चोरून नेणाऱ्या तिघांपैकी दुसऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी, जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या पोलीस वसाहतीत २५२ क्वाटर्स बांधकाम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. बांधकाम साईटवर कॉक्रिटींग बुम पंप ऑपरेटर चंद्रभुषण राम कैलास, बुम हेल्पर अरविंद कुमार गौड व पवन गिरी हे साईवर काम करतात व तिथेच राहतात. ९ सप्टेंबर रोजी सकाळी साईटचे प्रोजेक्ट इंजिनिअर सतीष रामदार परदेशी रा. मायादेवी नगर हे काम पाहत असल्याने साईटवर गेले. परप्रांतिय राहत असलेल्या खोलीत गेले असता तिघे दिसले नाही. खोलीत ठेवलेले दीड लाख रूपये किंमतीचे काँक्रीटींग बुम कंपनीचे रिमोट आणि जेसीबीची चावी जागेवर दिसून आली नाही. तिघांसह समानाचा शोधाशोध केली असता मिळून न आल्याने प्रोजेक्ट इंजिनिअर यांनी जिल्हा पेठ पोलीसा धाव घेतली. इंजिनिअर सतिष परदेशी यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता.
एकाला न्यायालयीन कोठडी, दुसऱ्याला अटक; तिसरा फरार
दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांनी संशयित आरोपी अरविंद कुमार हरीलाला गौंड (वय-२०) रा. शंकरपुर, गोरखपूरा याला १० ऑक्टोबर रोजी अटक करून न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. यातील दुसरा आरोपी चंद्रभुषण राम कैलास रा. परमेश्वर पुर गोरखपूर उत्तर प्रदेश याला जिल्हा पेठ पोलीसांनी आज अटक केली असून उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तर तिसरा संशयित आरोपी पवन गिरी रा. सकल गिरी माठ्या पो. महुआ बघरा, जि. देवरिया, उत्तरप्रदेश हा अद्याप फरार आहे. पुढील तपास संदीप पाटील, जितेंद्र सुरवाडे करीत आहे.