रावेर, प्रतिनिधी । आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर येथील पोलीस स्टेशनमध्ये पोलीस पाटील यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
पोलीस पाटलांच्या बैठकीत शासनाचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी काढलेले परिपत्रक व सूचनांची माहिती देण्यात आली आहे. यावेळी फटाके शॉप या ठिकाणी सुरक्षेचे दृष्टीने अचानक आग लागली तर कश्या उपाययोजना कराव्यात या विषयावर चर्चा करण्यात आले. फटाक्यापासून होणारे नुकसान जाळपोळ, प्रदूषण होऊ नये त्यामुळे सुरक्षेचे दृष्टीने सतर्कता बाळगणेबाबत तसेच अवैध धंद्याची पोलिसांना माहिती द्यावी वगैरे मार्गदर्शन करण्यात आले.